1 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे?
जेव्हा अशा सलग आकड्यांची बेरीज विचारलेली असते, तेव्हा कोणतेही गणितीय सूत्र वगैरे न अवलंबिता एक छोटीशी गोष्ट करायची.
त्यातली बरोबर मधली संख्या निवडायची, जी इथे ५ आहे.
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ + ७ + ८ + ९ = ४५ (९ आकडे)
या मधल्या संख्येला एकूण आकड्यांनी गुणा, येईल ते उत्तर!
- ५ गुणिले ९ = ४५!
आहे की नाही सोपे!
तुम्ही म्हणाल विषम संख्या आहे म्हणून बरोबर मधली संख्या निवडली.
काही हरकत नाही. आता आपण १ ते १० हे सलग आकडे घेउया!
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ + ७ + ८ + ९ + १० = ५५ (दहा आकडे)
यातली मधली संख्या आहे, ५ आणि ६ च्या मधली, म्हणजे ५.५.
मग करा गुणाकार…
- ५.५ गुणिले १० = ५५
बरं, आकडे लागोपाठचेच असायला हवेत, असेही काही नाही. पण त्यांतील अंतर मात्र सारखेच हवे. हे पहा…
१ + ४ + ७ + १० + १३ + १६ + १९ = ७० (७ आकडे)
यातली मधली संख्या आहे, १०.
करा गुणाकार…
- १० गुणिले ७ = ७०
आहे की नाही गंमत!
तुम्हीही करा आणि पहा, किती वेळ वाचतो, ते!
नमोस्तुते !
Comments
Post a Comment