बँकेतील कॅशियरला, लाखो रुपये रोख बघून मनात काय विचार येत असतील?

 मासळी बाजारातल्या या मांजरीला..

सभोवतालचे मासे पाहून जे वाटत असेल, तेच विचार कॅशिअरच्या मनात येत असावेत…

इतके अमाप मासे आहेत, पण मालक कोणी दुसराच…

बँकेच्या कॅशिअरचं पण तसंच असतं!

समोर असणारी लाखो-करोडोंची दौलत आपली नाही, तिचे मालक कोणी वेगळेच आहेत, आणि ते आपल्या बँकेत पैसे ठेवतात म्हणून आपण रोज चार घास सुखाने खाऊ शकतो ही जाणीव सदैव त्याच्या मनावर असते.

अर्थात, वरवर भासतो तितका कॅशिअरचा जॉब सुखावह नसतो, हे ही लक्षात असू द्या!

दिवसभराच्या देवघेवीनंतर जोपर्यंत संध्याकाळी कॅश टॅली होत नाही, तोपर्यत त्याच्या जीवात जीव नसतो, कारण आलेला फरक हा त्याच्या खात्यातून लगेचच वळता करून त्या दिवशीची कॅश तिजोरीत जमा करावी लागते.

इतकेच नव्हे, तर चुकून एखादी खोटी नोट त्याच्याकडून घेण्यात आली, तर त्याचा फटकाही वैयक्तिकरित्या त्यालाच बसतो.

काटेरी मुकुट आहे तो! फायदा काहीच नाही, उलट नुकसानीची टांगती तलवार सदैव डोक्यावर !!

नमोस्तुते !

Comments

Popular posts from this blog

Why banks don't give loans by pledging agricultural land?

कहा राजा भोज और कहा गंगु तेली' या म्हणीचा अर्थ काय?

Is it possible to get loan on agricultural land in India?